वसंतराव देशमुख विद्याविकास प्रशालेच्या हत्तुर येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न
.jpg)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ब्राह्मण समाज सेवा संघ सोलापूर संचलित वसंतराव देशमुख विद्याविकास प्रशालेच्या हत्तुर येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात शुक्रवारी दहा तारखेला संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. ज्ञानेश्वर रणशूर तसेच आय एम एस चे संस्थापक ए.डी. जोशी व रवींद्र मोकाशी परिवर्तन( अध्यक्ष परिवर्तन अकॅडमी सोलापूर) उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सौ मंगलाताई जोशी तसेच संस्थेचे सचिव व शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. मोहन देशपांडे, संस्थेचे संचालक श्री अभय जोशी, हरिभाऊ कुलकर्णी, रामचंद्र तडवळकर, मोहन मोकाशी, मीनाताई चाटी, सुधीर तडवळकर, प्रियवंदा गोडबोले हे उपस्थित होते. यावेळी हत्तुर येथील ग्रामस्थ तसेच ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. श्री प्रकाश कुलकर्णी यांनी प्रशालेत विविध रोपे भेट दिली. यावेळी शाळेच्या नियोजित वास्तूचे उद्घाटन फीत कापुन व हवेत फुगे सोडून करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांनी शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment