क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना व क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरूण मंडळ लष्कर, यांच्यावतीने महा आरोग्य शिबिर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 14, 2022

क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना व क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरूण मंडळ लष्कर, यांच्यावतीने महा आरोग्य शिबिर संपन्न

 क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना व क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरूण मंडळ लष्कर, यांच्यावतीने महा आरोग्य शिबिर संपन्न

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना व क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरूण मंडळ लष्कर,सोलापूर यांच्या सहयोगाने अश्विनी ग्रामिण रुग्णालय कुंभारी यांच्या वतिने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन अश्विनी ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालय,दवाखाना व संशोधन केंद्र, कुंभारी यांच्या वतीने  क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना व क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरूण मंडळ लष्कर,सोलापूर यांच्या सहयोगाने  "कै.सौ.भारतबाई संभाजी क्षीरसागर व संभाजी शिवराम क्षीरसागर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त  मोफत महाआरोग्य शिबिर  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय, लष्कर सोलापूर येथे संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन अश्विनी सहकारी रुग्णालय चे संचालक मा. अशोक लांबतुरे, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, यांच्या हस्ते झाले. यावेळी शिबिराचे आयोजन क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना चे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, केंद्रीय मुख्याध्यापक टि. एस.  क्षीरसागर सर, किशोर जाधव सर, मिनेश  बोराडे, कैलास जरीपटके, महेश जोगदंड, रामचंद्र जोगदंड, विकास जरीपटके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     यावेळी अश्विनी ग्रामीण वैद्यकीय दवाखाना व संशोधन केंद्राचे डॉ. रक्षा गायकवाड, डॉ. मुशर्फा नदाफ, डॉ. निकिता ठाकरे, डॉ.  संतोष मुंडे,  डॉ. संकेत वारुळे, डॉ.  तुषार मगर  या   तज्ञ डॉक्टराकडून तपासणी करून  मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी अशोक बोल्लू, अश्विनी कोरे, सुमन शिवशरण, बिलाल नल्लाबद्दु, शारदा पाटील आदी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. लष्कर परिसरातील गरीब कुंटुबातील 210 नागरिकांनी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया कमी दरात, विविध योजना अंतर्गत मोफत करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. 
          शिबिरामध्ये बालरोग,त्वचा रोग,हृदयरोग,दमा (अस्थमा),पोटाचे विकार,हस्तीरोग,मेंदूचे विकार , पक्षाघात,संधिवात,इ.सी.जी.,रक्तदाब (बी.पी.), मधुमेह (शुगर),स्त्रीरोग, प्रसुतीपूर्व प्रसुतिपश्चात आदी तपासण्या करण्यात आल्या.शिबिर यशस्वी होण्यासाठी ओंकार पाटोळे,अभिषेक हटकर,शुभम पारधे,आदिनाथ पारधे ,समर्थ पाटोळे,आदींनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages