कल्पनाची कल्पना जिद्दीने उतरली सत्यात
.jpg)


महुद बु येथे गांडूळ खत निर्मिती प्रकल्प कार्यक्रम संपन्न
सांगोला (कटूसत्य वृत्त):- माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचालित’सखी सहेली महिला बचतगट आयोजित ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ आयोजित ‘गांडूळ खत निमिर्ती प्रकल्प’ कार्यक्रम ‘चव्हाणवाडी,महूद’ येथे संपन्न झाला. प्रास्ताविकामध्ये सौ. नीता लाटणे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली. त्यांनी आपली प्रास्ताविकात,” संस्था गेली ४४ वर्षे सांगोला तालुक्यातील ग्रामीण महिला व बालकांच्या विकासासाठी शिक्षण,आरोग्य,अन्याय अत्याचाराविरुद्ध संघर्ष, आर्थिक स्वावलंबन आणि पर्यावरण साक्षरता या पाच बिंदूभोवती कार्य करीत आहे. संस्थेचे पूर्व प्राथमिक ते माध्यमिक विद्यालय सांगोला येथे सुरु आहे. संस्थेमार्फत महिलांसाठी HB, रक्त शर्करा , नेत्र तपासणी केली जाते. संस्थेचे 115 बचतगट सांगोला तालुक्यात सुरु असून महिला या गटांच्या माध्यमातून कर्ज घेऊन विविध व्यवसाय उभारून आर्थिक सक्षम होत आहेत. कुटुंबातील सर्वांनाच योग्य न्याय मिळावा यासाठी मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र सुरु आहे. संस्थेने संगेवाडी येथे बंधारा बांधून गावात पिण्याच्या पाण्याची सोय केली. तसेच वाटंबरे येथे पाझर तलाव,सांडवा दुरुस्ती, तसेच नवीन बंधारे बांधले. यामुळे वाटंबरे आणि आसपासच्या खेड्यांना मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. मागील वर्षी गार्डी, ता. पंढरपूर येथील गाव तलावातील गाळ काढून दुरुस्ती केली. याचा गावकऱ्यांना लाभ होत आहे.” अशी माहिती दिली.
संस्थेच्या बचतगट संघटिका संगीता खडतरे यांनी त्यांच्या बचत गटातील महिलांनी सुरु केलेल्या विविध व्यवसायामुळे महिलांनी कशी प्रगती केली याची माहिती दिली. यानंतर संस्थेच्या विश्वस्त डॉ. केतकी देशपांडे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व आणि अशा भाजीपाल्या मुळे शरीरास होणारे फायदे आणि रासायनिक खते वापरामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याची सविस्तर माहिती दिली. तसेच गांडूळ खताला भविष्यात भरपूर मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. वाटंबरे येथील सुरेश पवार यांनी त्यांच्या ‘यशराज गांडूळ खत प्रकल्पाची उभारणी कशी केली याची माहिती सांगितली. गांडूळ खत वापरून केलेल्या शेतीत उत्पन्न किती जास्त मिळते व या शेतीचा शेतकऱ्यांना कसा फायदा होत आहे,
मागील वर्षी चव्हाणवाडी येथे 5 गांडूळ बेड दिले होते. त्यात तयार होणारे खत वापरण्यामुळे महिलांच्या शेती उत्पन्नात वाढ झाली आहे. तसेच त्यातून महिलांना उत्पन्न सुरु झाले आहे. हा गांडूळ खताचा प्रकल्प यशस्वी करणाऱ्या कल्पना चव्हाण यांनी स्वत: चा अनुभव सांगितला. गेल्या 20 वर्षापासून कल्पना चव्हाण या संस्थेच्या संपर्कात आहेत. महूद येथील संस्थेच्या बचत गटाचा त्यांना खूप उपयोग झाला असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेने त्यांना उस्मानाबाद येथील ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ ही संस्था पाहण्यासाठी नेले होते. तसेच संस्थेने महिलांना गांडूळ खताचे प्रशिक्षण दिले होते. यातून प्रोत्साहन घेऊन संस्थेने त्यांना अल्पदरात बेड उपलब्ध करून दिले होते. गांडूळ खताचा वापर करून डाळिंब आणि चिक्कू चे चांगले उत्पन्न मिळाल्याचे सांगितले. तसेच या वर्षभरात 2 टन उत्पन्न मिळाल्याची माहिती दिली. सध्या कल्पनाताई अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. या बरोबरच त्या आसपासच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतात. कल्पना चव्हाण यांचा मुलगा स्वप्नील चव्हाण यांनी Bsc agri चे शिक्षण घेतले आहे. त्यांनीही नत्र, स्फुरद व सेंद्रिय कडबा वापरून शेती करावी. रासायनिक खताचा वापर केल्यामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामाची त्यांनी माहिती दिला. या नंतर महूद च्या सरपंच सौ.संजीवनी लुबाळ यांनी गांडूळ खताचा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी महिलांना शुभेच्छा दिल्या. महूद येथील चव्हाणवाडी मधील कमल सदाशिव डोंगरे यांच्या शेतात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानंतर सुरेश पवार व कल्पना चव्हाण यांनी ‘गांडूळ बेड’ कसा तयार करावा याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार मीरा कोळेकर यांनी मानले.या कार्यक्रमास सरपंच सौ. संजीवनी लुबाळ, संस्थेच्या विश्वस्त डॉ.केतकी देशपांडे, श्री. सुरेश पवार, हणमंत डोंगरे, रामचंद्र चव्हाण, नवनाथ चव्हाण, दादासो डोलतडे बचत गटातील महिला व पुरुष वर्ग उपस्थित होता.
No comments:
Post a Comment