डोंबे हॉस्पिटल सांगोला येथे बुधवारी दमा व फुफ्फुसाची मोफत तपासणी शिबिर

डोंबे हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे तर्फे आयोजन
सांगोला (कटूसत्य वृत्त):- डोंबे हॉस्पिटल, सांगोला व लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने डोंबे हॉस्पिटलच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक १५ जून २०२२ रोजी सकाळी १० ते ४ रोजी डोंबे हॉस्पिटल मेडिकल डायग्नोस्टिक सेंटर यश नगर, पोलिस स्टेशन जवळ, पंढरपूर रोड, सांगोला सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे दमा व फुफ्फुसाची मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रक्तातील हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण, दमा व फुफ्फुसाची स्पायरोमेट्री मशीनद्वारे मोफत तपासणी केली जाईल.
आपल्या प्रकृतीत पुन्हा, पुन्हा उद्भवणारा खोकला, सतत छाती भरल्यासारखे वाटणे ,जिना चढताना व उतरताना धाप लागणे, बिडी किंवा सिगारेट ओढण्याची सवय ,चूल किंवा अन्य प्रकारे श्वासावाटे घेतला जाणारा धूर ,कामगार किंवा प्रदुषणात काम करणाऱ्या व्यक्ती, श्वासोच्छवासावेळी छातीतून शिट्टीसारखा आवाज येणे या संदर्भात स्पायरोमेट्री मशीनद्वारे तपासणी व दम्याबद्दलची संपूर्ण माहिती पुस्तके, दम्याची औषधे कशी घ्यावीत. याची व्यवस्थित माहिती तज्ञ डॉक्टर डॉ. शैलेश शं. डोंबे (M.B.B.S., D.N.B. Family Medicine) यांचेकडून मिळणार आहे.तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डोंबे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.शैलेश डोंबे व लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment