सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे एच.एस.सी. परीक्षेत सुयश

कुमारी अंकिता यलमार कला शाखेत तालुक्यात प्रथम
सांगोला (कटुसत्य वृत्त): फेब्रु./ मार्च मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी. परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने काल बुधवार, दिनांक ८ मे २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखत कला, वाणिज्य व शास्त्र शाखेत दैदिप्यमान सुयश प्राप्त केले आहे.कला शाखेचा निकाल ८१.६६%, वाणिज्य शाखेचा निकाल ९४.७३ % तर शास्त्र शाखेचा निकाल ९७:६२% लागला असून या निकालाबद्दल संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
कला शाखेत कुमारी यलमर अंकिता अरुण ५४४/६०० (९०.७६%) प्रथम क्रमांक, कुमारी घाडगे धनश्री आण्णासो ५१७/६००(८६.१७%) कुमारी हजारे सृष्टी जनार्धन ५१७/६०० (८६.१७% द्वितीय क्रमांक विभागून, कुमारी नदाफ रईसा दस्तगीर ४९४/६००(८२.३३%) तृतीय क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. वाणिज्य शाखेतून कुमारी सपाटे सानिका महेश ५३१/६०० (८८.५०%) प्रथम क्रमांक, कुमार कुलकर्णी क्षितिज श्रीपाद ५२४/६००(८७.३३%) द्वितीय क्रमांक, कुमारी चंदनशिवे धनश्री बाळू ५२०/६००(८६.७६%) तृतीय क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे तर शास्त्र शाखेमध्ये कुमारी भुसे दिपाली बापू ५३५/६००(८९.१७%) प्रथम क्रमांक, कुमारी चौगुले स्नेहल शशिकांत ५२२/६००(८७.००%) द्वितीय क्रमांक, कुमारी जावीर शुभांगी दत्तात्रय ५१२/६००(८५.३३%) तृतीय क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे.
वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म. शं. घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य गंगाधर घोंगडे,पर्यवेक्षक बिभीषण माने, अजय बारबोले, पोपट केदार, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.व निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे पालकासमवेत संस्थेचे सचिव म.शं.घोंगडे, सांगोला पंचायत समिती भागाधिकारी कुमठेकर साहेब,प्राचार्य, उपप्राचार्य व उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांचे हस्ते सत्कार करण्यात आला करण्यात आला व अभिनंदनाचे पत्र देण्यात आले.यावेळी ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या सत्काराबद्दल पालकांनी व विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली असून विद्यामंदिरच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment