प्रहार संघटनेच्या वतीने पंचायत समिती समोर धरणे आंदोलन

सांगोला (कटूसत्य वृत्त):- प्रहार अपंग संघटना यांच्या वतीने 5%निधी न वाटप करणारया ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी म्हणून पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी पंचायत समितीच्यावतीने गटविकास अधिकारी यांनी लेखी उत्तर देण्यामुळे हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले अशी माहिती तालुका अध्यक्ष सतिश दिडवाघ यांनी दिली.
या अंदोलनाला डॉ बाबासाहेब देशमुख, कामगार नेते शिवसेनेचे सांगली शहर अध्यक्ष-हरिदास लेंगरे, माजी नगरसेवक नागेश जोशी, कामगार नेते-राजाभाऊ मेटकरी यांनी पाठिंबा दिला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष-दत्ता चौगुले, जिल्हा सचिव-संजय जगताप, जिल्हा उपाध्यक्ष-सिद्राया माळी, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख-नविद पठाण, तालुका अध्यक्ष-सतिश दिडवाघ,चंदु पवार, महेश भोसले, गुलाब जरे, सागर कदम, रेखा पवार,राजस्री मस्के, मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment