विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे चार उमेदवारांचे अर्ज दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 8, 2022

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे चार उमेदवारांचे अर्ज दाखल

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे चार उमेदवारांचे अर्ज दाखल



             मुंबई, (कटुसत्य वृत्त): विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून बुधवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय व प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी अर्ज दाखल केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधीमंडळ पक्ष प्रतोद आ. ॲड. आशीष शेलार, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, प्रदेश सरचिटणीस आ.चंद्रशेखर बावनकुळे व आ. अतुल सावे तसेच आ. गोपीचंद पडळकर, आ. बबनराव पाचपुते, आ.जयकुमार रावल, आ. अशोक उइके व आ.जयकुमार गोरे उपस्थित होते.

             वरील उमेदवारांखेरीज पक्षातर्फे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष मा. उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा अर्ज उद्या दिनांक ९ रोजी दाखल करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages