जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 8, 2022

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक संपन्न

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक संपन्न

               सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-जिल्ह्यात अंमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी होऊ नये यासाठी  विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

               जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत श्रीमती सातपुते बोलत होत्या. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, औषध निरीक्षक सचिन कांबळे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, सिव्हील हॉस्पिटलचे डॉ. बी.टी.दुधभाते, पोलीस निरिक्षक एस.आर. शिंदे आदी उपस्थित होते. 

               श्रीमती सातपुते यांनी सांगितले की, आपल्या जिल्ह्यात खसखस आणि गांजाची लागवड होऊ नये, याबाबत कृषी विभागाने दक्षता घ्यावी. कृषी सहायकाने पीक नोंदीची माहिती घेताना काही आढळले तर पोलीस विभागाला कळवावे. मेडिकल वापरासाठी आलेली औषधे ड्रग्ज म्हणून वापर होऊ नये, याची दक्षता अन्न व औषध प्रशासनाने घ्यावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाने रासायनिक कारखान्यांमध्ये अंमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

               प्रत्येक विभागांनी दत्तक घेतलेल्या तालुक्यांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन केल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती जनतेला द्यावी. याबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages