पाचशे कारखान्यांतील यंत्रमागाची धडधड बंद
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सूत दरात झालेली वाढ तसेच एमआयडीसीत मूलभूत सोयीसुविधांचा अभाव यामुळे सोमवारी (ता. ६) पूर्वभागातील गांधीनगर, एमआयडीसी परिसरातील पाचशे यंत्रमाग कारखानदारांनी कारखाने बंद ठेवत प्रशासनास निवेदन देऊन लाक्षणिक बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.सूत दरातील भरमसाठ वाढीमुळे व कारखाना परिसरात मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याने याकडे समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा यंत्रमागधारक संघाच्यावतीने सोमवारी एकदिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला. मागील महिनाभरापासून कापूस दर वाढल्याने सुताचे दरही वाढले आहेत. कापूस दरवाढीमुळे देशातील गिरण्यांनी सुताचे उत्पादन कमी केले.सुताचे दर दुपटीने वाढले आहेत. त्या प्रमाणात उत्पादनास दर मिळत नाही. त्याचबरोबर महापालिकेकडून अनेक वेळा निवेदने देऊनही मूलभूत सोयीसुविधा दिल्या जात नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय बंद पुकारला आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment