जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपण

सांगोला (कटूसत्य वृत्त):- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलताना मुख्याधिकारी केंद्रे म्हणाले की, सांगोला शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली असून कडक उन्हाळ्यातही टँकरद्वारे पाणी देऊन झाडे जगावण्याचे काम नगरपालिका करते आहे. नागरिकांचेही यासाठी सहकार्य मिळत असून सर्वांच्या सहकार्यामुळेच माझी वसुंधरा स्पर्धेत सांगोला शहराचा सहावा क्रमांक आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी स्टेशन प्रबंधक एस. एन. सिंह, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, उपाध्यक्ष दीपक चोथे, महादेव दिवटे, डॉ. विधिन कांबळे, प्रमोद दौंडे, अरविंद डोंबे, सुनिल मारडे, उप स्टेशन प्रबंधक भोला नाथ यादव, राजेश पंडित, रौशन कुमार, वरीय अनुभाग अभियंता अखिलेश कुमार, वरीय वाणिज्य लिपिक व्यंकटेश कोरे, काँटावाला उत्तम चौधरी, समाधान रणश्रृंगारे, चिन्तामणी कोडग, वसंत बंडगर, स्वप्निल वाघमारे, वैभव, सिग्नल अनुरक्षक सागर निकम आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment