अवैधपणे चालणाऱ्या दारू हातभट्टी वर लोणी काळभोर पोलिस ठाणे चा छापा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

अवैधपणे चालणाऱ्या दारू हातभट्टी वर लोणी काळभोर पोलिस ठाणे चा छापा

अवैधपणे चालणाऱ्या दारू हातभट्टी वर  लोणी काळभोर पोलिस ठाणे चा छापा

             लोणी काळभोर (कटूसत्य वृत्त):- लोणी काळभोर पोलीस ठाणे कडील पोलीस हवालदार/४३२ गायकवाड यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की राठोड वस्ती, कॅनोल चे कडेला , शिंदवणे, ता.हवेली जिल्हा पुणे येथे गावठी हातभट्टी दारू तयार करणे करिता हातभट्टी चे रसायन व साहित्या सह गावठी दारू बनवीत आहे आशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने नमूद बातमीचा आशय पोलीस हवालदार /४३२गायकवाड वरिष्ठ कारवाई बाबत सूचना दिल्या त्या प्रमाणे नमूद पथकाने १६/४५.वाजण्याच्या. चे सुमारास नमूद ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी दोन मोठ्या पत्र्याचे भांड्या मध्ये गूळ तुरटी व पाणी यांचे अंदाजे २००० लिटर रसायन व साहित्या निशी गावठी दारू बनवीत असताना इसम नामे १) पांखाबाई व्यकंट राठोड,वय ५२ वर्ष रा,राठोड वस्ती शिंदवणे ता. हवेली जिल्हा पुणे २)मंदाराणी शाखा राठोड वय ५२ वर्ष रा,राठोड, वस्ती शिंदवणे ता.हवेली जि पुणे,३)शंकर फुलसिंग ठाकूर वय ३४ वर्ष राहणार लाड वस्ती सोरतापवाडी ता. हवेली जि. पुणे ४)अक्षय देविदास मुसळे वय ३२ वर्ष रा जय मल्हार रोड बाजार मैदान जवळ दुकानाच्या चे मागे उरुळी कांचन ता. जिल्हा पुणे हे मिळून आले सदर ठिकाणी असलेल्या रसायन व साहित्याची पाहणी केली असता नमूद ठिकाणी १) २०००/- रू किमतीचे दोन मोठ्या पत्र्याचे भांड्यात दोन हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन कि.अं.प्रती लि.१० रू प्रमाणे २)१०००/- दोन पत्र्याचे भांडे अंदाजे प्रत्येकी १००० लि जु.वा.कि.अं.असा माल मिळून आला असून नमूद मालापैकी आवश्यक तेवढे सँम्पल करीता नमुना घेण्यात आल्या नंतर उर्वरित माल जागीच नष्ट करण्यात आला. 

             पोलीस आयुक्त,पुणे शहर मा.अमिताभ गुप्ता व सह आयुक्त पुणे शहर मा. संदीप कर्णिक यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार बेकायदेशीर धंदे करणारे,तसेच शरीर व मालाविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांना कठोर कारवाई करून त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबत पुणे शहर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले आहेत.

             सदर ची उल्लेखनीय कामगिरी राजेंद्र मोकाशी वरीष्ठ पोलीस निरीक्षक,सुभाष काळे पो, नि (गुन्हे) लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील स पो नि/ राजू महानोर,यांचे सोबत पो.ह.वा/नितीन गायकवाड,संतोष होले पो.ना./श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर,अमित साळुंखे,पो. कॉन्स्टेबल राजेश दराडे,बाजीराव वीर, शैलेश कुदळे,दिगंबर साळुंखे, मल्हार ढमढेरे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages