श्री सिद्धेश्वर महिला तंत्रनिकेतन मध्ये “शिवस्वराज्य दिन” कार्यक्रमाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

श्री सिद्धेश्वर महिला तंत्रनिकेतन मध्ये “शिवस्वराज्य दिन” कार्यक्रमाचे आयोजन

श्री सिद्धेश्वर महिला तंत्रनिकेतन मध्ये “शिवस्वराज्य दिन” कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री सिद्धेश्वर महिला तंत्रनिकेतन विद्यालयाच्या वतीने शिवस्वराज्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुड्डेवाडीचे उपशिक्षक श्री संतोषकुमार मनगोंडे सर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून 1974 रोजी स्वराज्याची राजधानी रायगडावर झाला होता. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाचे, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संतोषकुमार मनगोंडे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची उल्लेखनीय कामगिरी त्यांचे कर्तुत्व आपल्या मनोगत द्वारे व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन धरणे यांनी शिवराज्याभिषेक सोहळा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगत द्वारे महाराजांचे कर्तृत्व, कुशल नेतृत्व,मनोशैली व त्यांचा राज्याभिषेक सोहळा व्यक्त केला.कार्यक्रमास सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्रा. प्रमोद शिवगुंडे, प्रा. नवनाथ माने  तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. श्रीशैल मळेवाडी , प्रा. माधुरी हिरेमठ, प्रा. मृदुला हरसूरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ज्योती कोरे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. श्रीशैल मळेवाडी यांनी केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages