सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक पारितोषीक वितरण सोहळा उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक पारितोषीक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

 सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक पारितोषीक वितरण सोहळा उत्साहात संपन्न


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक पारितोषीक वितरण सोहळा  उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर ' सकाळ' चे  निवासी संपादक अभय दिवाणजी होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान संस्थेचे सहसचिव   संजय नवले,यांनी भूषविले.  यावेळी  प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य  डॉ.शेखर जगदे व  डॉ.रवींद्र व्यवहारे तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वार्षिक प्रकल्प स्पर्धा 'प्रयोग २k२२' , स्पेशल अवॉर्ड, स्टुडंट्स कौन्सिल अवॉर्ड, अलुमनी अवॉर्ड आणि बेस्ट आउटगोइंग स्टुडंट्स अवॉर्ड अशा पाच विभागातून  जवळपास 110 बक्षिसांचे वितरण करण्यात आले. १००% उपस्थितीसाठी प्रथम वर्षाची कु.श्रद्धा कविटकर व संकेत चव्हाण तर अंतिम वर्षाचा शशिकांत पाथरूट यांना गौरवण्यात आले. तसेच बेस्ट अकॅडमीक परफॉर्मन्स कु. उज्ज्वला चव्हाण, इलेक्ट्रिकलची आरती कुंताफळे इएनटीसीची श्रुती बिराजदार, सी.एस.ई. ची निकिता शेट्टी, मेकॅनिकल मधुन स्वराज घोंगडे, तसेच संपूर्ण कॉलेज मधुन सिव्हिलची  कु.सायली उबाळे यांना  यावर्षीचे 'बेस्ट आउटगोइंग स्टुडंट्स' म्हणून गौवरण्यात आले. तसेच सुखदा मोरे हिला  २०००रु. रोख रक्कम देऊन 'अर्जुन अवॉर्ड ने गौरविण्यात आले.तर 'विक्रम अवॉर्ड' साठी ५०००रु रोख  राहुल अडकी, आदित्य म्हणता, विनायक कामुर्ती, सागर बंडगर यांना देण्यात आला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ऋतुजा राऊत, सुझान नदाफ, तांजिला बिजली, अपूर्वा एडके, सानिया हकीम, प्राजक्ता सुरवसे यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शेखर जगदे, डॉ. सुवर्णा क्षीरसागर, प्रा. सुनीता सगट, स्टुडंट्स कौन्सिलचा जनरल सेक्रेटरी श्रेयस सलगर, स्पोर्ट्स सेक्रेटरी गुरुलिंग जोकार, मीडिया सेक्रेटरी सिद्धार्थ सरवदे व स्टुडंट्स कौन्सिल मेंबर्स यांचा सहभाग होता. यावेळी प्राचार्य डॉ. शंकर नवले व प्रमुख पाहुणे अभय दिवाणजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. शेखर जगदे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages