लोकमंगल कृषिजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचालित लोकमंगल कृषिजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन व जागतिक पर्यावरण दिन पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाला मा. सौ. सुप्रिया निशानदार (State co-ordinator in Centre for environment Education)प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या.त्यांनी या वर्षाचा पर्यावरण दिनाचा विषय,शाश्वत भविष्यासाठी वाटचाल,जैवविविधता संवर्धन,पर्यावरणाशी आपली बांधिलकी यासोबतच Environment Service Scheme (ESS) अशा विविध विषयांवर माहितीपूर्ण व सुंदर भाषेत विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाशी संवाद साधला. त्यांच्या विविध प्रश्नांनमुळे सर्व विद्यार्थी उत्साही दिसत होते.संवादादरम्यान मा. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना विचार मांडण्यास प्रोत्साहन दिले. संवादासोबतच त्या या क्षेत्रात कश्या आल्या याचा एक प्रेरणादायी अनुभव पाहुण्यांनी सर्वांसमोर मांडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सायली तळेकर हिने केले तर प्रस्तावना व प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. एन. खुणे यांनी करून दिली . महाविद्यालयातील सर्व विद्यार्ध्यांसोबत प्रा. महाजन एस आर., प्रा. आदलिंगे पी. एम, प्रा. डॉ. तथागत वाघमारे, डॉ. रश्मी हेगडे, प्रा. कदम ए. आर., प्रा. सरकाळे ए. पी. आदि कार्यक्रमास उपस्थित होते. आभार प्रदर्शनानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

No comments:
Post a Comment