कुर्डूवाडी येथे पंढरपूर रस्त्यावर वारकऱ्यांचा बसचा अपघात.! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 13, 2022

कुर्डूवाडी येथे पंढरपूर रस्त्यावर वारकऱ्यांचा बसचा अपघात.!

 कुर्डूवाडी येथे पंढरपूर रस्त्यावर वारकऱ्यांचा बसचा अपघात.!

 

कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- वारकऱ्यांची बस पंढरपूर कडून भरधाव वेगाने येत असताना कुर्डूवाडी जवळील आदिशक्ती मंगल कार्यालया समोर टिपिर अचानक आढावा आल्याने बस व टिपर च्या मोठ्या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या बसमध्ये ६० प्रवासी बालबाल बचावले तर १५  प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत यापैकी एकाला सोलापूर सिव्हिलला हलविण्यात आले आहे.यात सुदैवाने जीवित हानी मात्र टळली आहे.मिरज-माजलगाव एम एच-४५.एस-८३७१ ही बस पंढरपूर कडून भरधाव वेगाने येत असताना कुर्डूवाडी जवळ आल्या नंतर आदिशक्ती मंगल कार्यालया समोर एम एच-४५ डी-१०५५ क्रमांकाचा टिपिर अचानक आढावा आल्याने बस व टिपर च्या मोठ्या अपघातात बस चालकांच्या सतरकते मूळे बस मधील ७० ते ८० प्रवाशांचा जीव मात्र बचावला त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. यामध्ये बस स्त्याच्या कडेला पडलेल्या मातीच्या ढिगार्‍यावर जाऊन अडकल्यामुळे बस चालकाच्या नियंत्रणात आली व त्यापुढे वीस फुटाचा खड्डा असल्याने चालकाच्या सावधानती मुळे बस पलटी होता होता राहिली.अन्यथा मोठा अनर्थ झाला असता असे वारकरी प्रवासातून बोलले जात होते.अपघातस्थळी कुर्डूवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत वाघमारे हे पोलिसांची कुमक घेऊन तात्काळ पोहचले,कुर्डूवाडी बसस्थानकातील आगार व्यवस्थापक व कर्मचारी यांनी बसमधील प्रवाशांची योग्य ती सोय करून त्यांना त्यांचा गावी पाठवले. कुर्डुवाड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर नर्स व कर्मचाऱ्यांनी बस मधील चालकासह १५ जखमी प्रवाशांवर औषध उपचार केले.
बस चालक प्रकाश तुकाराम मुंढे वय ३४ रा.पाताळगंगा ता-कंधार जि-नांदेड तर वाहक सचिन विठ्ठल ढोले संगमनेर जि-अहमदनगर,येथील आहेत.टिपर चालकाचे नाव मात्र आद्यप पर्यत समजले नव्हते.जखमी प्रवासी- द्रोपदी बाबुराव यादव वय 65 माजलगाव,साहेबराव निवृत्ती कोळेकर वय 60 रा. कोठेवाडी,भाऊराव विठ्ठल गव्हाणे वय 65 रा.बोरगाव ता.धारूर नामदेव बनोराम मदने वय 60 रा.जवळा ता.धारूर, सुधाकर किसन बोडके वय 50 रा.हिंगणी,कोंडीबा बापूराव गव्हाणे वय 50 रा.भोगाव, उद्धव माणिकराव दराडे वय 65 रा लोहगाव रोड, कुसुम भास्कर मुंडे वय 55 रा.इंनफवाडी,सविता बन्सीलाल मुंडे वय 45 रा.परळी, बाजीराव तातेराव सावंत वय 65 रा.बोरी, माणिक त्रिंबक डेंगळे वय 79 रा.पिंपळवाडी,ता.वाशी,दिलीप राजेश्वरराव पांडे वय 75 शिवराम नगर परभणी,उत्तम भुंजणाव लाटे वय 65 रा.ममदापूर ता.परळी,आदी सह प्रवाशांना उपचारार्थ थांबवण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages