सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे ए टी एस परीक्षेत यश

सांगोला (कटूसत्य वृत्त):- गुणवत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर असणाऱ्या सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाने यशाचा झेंडा कायम ठेवत राज्यस्तरीय ए.टी.एस परीक्षेत यश संपादन केले आहे. 17 एप्रिल 2022 रोजी सदर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षाच्या लॉकडॉऊन कालावधीनंतर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत जिल्हा आणि राज्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय हे नेहमी विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी प्रयत्न करीत असते त्यामुळे या विद्यालयाची सर्वदूर ख्याती आहे. सदर यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
इयत्तानिहाय यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे इयत्ता
इयत्ता पहिली प्रथम क्रमांक-तेली अनुश्री नागेश 86/100 केंद्रात 1ली, जिल्ह्यात 5वी, राज्यात 8वी
इयत्ता दुसरी-सई भारत कदम 152/200 ,केंद्रात 4 थी
जिल्ह्यात 16 वी,राज्यात 23 वी.
इयत्ता तिसरी-दीक्षांत सुभाष क्षीरसागर 264/300 केंद्रात 8वा, जिल्यात 10 वा ,राज्यात 15 वा
यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्था अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव म.शं. घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय वर्ग, प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे यांनी अभिनंदन व कौतुक केले.
No comments:
Post a Comment