बिटले -मलिकपेठ माळी वस्ती रस्त्याचे बाळराजे पाटील यांच्या हस्ते भुमिपूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 13, 2022

बिटले -मलिकपेठ माळी वस्ती रस्त्याचे बाळराजे पाटील यांच्या हस्ते भुमिपूजन

 बिटले-मलिकपेठ  माळी वस्ती रस्त्याचे बाळराजे पाटील यांच्या हस्ते भुमिपूजन


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून माजी आमदार राजन पाटील हे आजतागायत प्रयत्नशील आहेत. मोहोळ शहराचा सर्वांगीण विकास केवळ राष्ट्रवादीच साध्य करू शकते या विश्वासाने शहरातील मतदार बांधवांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात विकासाची सत्तासूत्रे दिली. वित्तमंत्री अजित दादा पवार यांच्या विशेष सहकार्यामुळे आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार यशवंत माने यांच्या विशेष प्रयत्नाने तालुक्यात विकासनिधी विविध योजनांच्या माध्यमातून खेचून आणला आहे. यापुढील काळातही रस्ते, पाणी, आरोग्य, वीज विषयक मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही बाळराजे पाटील यांनी दिली.बिटले येथे राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखी व आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या बिटले -मलिकपेठ अप्रोच माळी वस्ती रस्त्याचे भुमिपूजन लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाळराजे पाटील बोलत होते.यावेळी या परिसरातील रस्त्यांना शासन स्तरावरून आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने बाळराजे पाटील यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी शहाजी पाटील,शरद सलगर, संदीप पाटील,बाळू काळे, काशिनाथ आदलिंगे, अंकुश आदलिंगे,हुसेन तांबोळी,सुनील सलगर, वसंत डोंबाळे इत्यादी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages