शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

सांगोला (कटूसत्य वृत्त):-येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2022- 23 साठी तंत्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्यकडून पदविका अभियांत्रिकी अर्थात डिप्लोमा इंजीनियरिंगच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांनी दिली. डिप्लोमा इंजीनियरिंगच्या थेट द्वितीय वर्षांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असून त्यादृष्टीने डी.टी.ई.ने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता शुक्रवार दि.10 जून ते 8 जुलै 2022 पर्यंत असा कालावधी दिला आहे. या कालावधीत विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी तंत्रशिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवडून ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅनड छायाप्रती अपलोड करणे , कागदपत्रांची पडताळणी करून आपला अर्ज निश्चित करू शकतात. दिनांक 11 जुलै रोजी मंडळाच्या संकेतस्थळावरती प्रोविजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येईल. दिनांक 12/7/2022 ते 14/7/2022 या कालावधीमध्ये विद्यार्थी त्यांच्या ऑनलाइन अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास ते दुरुस्त करून घेऊ शकतात. अंतिम गुणवत्ता यादी दिनांक 15 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थी त्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेऊ शकतात. विद्यार्थ्यांकडून हे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना बऱ्याचदा चुका होत असतात त्यादृष्टीने शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये असलेल्या सुविधा केंद्रामध्ये (सुविधा केंद्र क्रमांक 6471) मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सदर रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाची संबंधित कागदपत्रे, आधार कार्ड, फोटो घेऊन सुविधा केंद्रास भेट द्यावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड यांनी केले. डिप्लोमा अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाचा लाभ बारावी सायन्स, होकेशनल, एम .सी . व्ही .सी. आणि आय .टी .आय. उत्तीर्ण होणारे विद्यार्थी घेऊ शकतात. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया समन्वयक श्री. एस.एम. भोसले.( 9767302455) यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment