जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपळे जगताप व बकोरी याठिकाणी केले 2100 झाडांचे वृक्षारोपण

हवेली (कटूसत्य वृत्त):-जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती सेवा समिती, पिंपळे जगताप ग्रामस्थ, बकोरी ग्रामस्थ यांचे माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले पिंपळे जगताप याठिकाणी धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पात 2000 देशी झाडे लावण्यात आली व बकोरी डोंगरावर बकोरी देवराई वनराई प्रकल्पात 200 देशी झाडे लावण्यात आली.पिंपळे जगताप याठिकाणी सकाळी 6 वाजता वृक्षारोपणास सुरुवात झाली ते रात्री 7 पर्यंत वृक्षारोपण चालू होते.जुन /जुलै महीन्यात 21000झाडांचा टप्पा पार पाडणार असल्याचे माहिती सेवा वृक्षसंवर्धन समितीचे शिरूर तालुका अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांनी सांगितले . पिंपळे जगताप व बकोरी याठिकाणी लागणारी सर्व झाडे दान देण्याचे उद्योजक सागर भाढळे व राहुल गव्हाणे यांनी सांगितले. आजची सर्व 2200 झाडे वृक्ष मित्र ऊद्योजक सागर भाडळे यांनी दिली होती.
सदर कार्यक्रमांसाठी उपस्थितांमध्ये ऊद्योजक सागर भाडळे, राहुल गव्हाणे (या.सरपंच डीग्रजवाडी) जेष्ट पत्रकार शरदराव पाबळे,जनता दलाचे नेते नाथाभाऊ शेवाळे, धर्मराज वाजे मा.सरपंच वाजेवाडी,सागर दरेकर उपसरपंच सनसवाडी ,रमेश गडदे सरपंच शिक्रापूर, बाळासाहेब पराड, कमलेश बहीरट अध्यक्ष माहिती सेवा समिती हवेली तालुका ,शरद टेमगीरे अध्यक्ष शिरुर तालुका, शरद थोरात अध्यक्ष दौंड तालुका माहिती सेवा समिती, बाळासाहेब वारघडे कार्याध्यक्ष पुणे जिल्हा माहिती सेवा समिती,ऊद्योजक विजराव जाधव,डाॅ.अजिंक्य तापकीर, डॉ.टेमगीरे , डॉ.वडजे डॉ.दातखीळे ,ॲड.दौंडकर ,कुनाल भेंडभर सरपंच पिंपळे जगताप, वन विभागाचे गायकवाड साहेब, वायकर साहेब ,निलेश फडतरे , रामदास भेंडभर, नवनाथ हरगुडे सरपंच सनसवाडी, अनील दरेकर ,गोरख दरेकर,अमोल येवले, प्रवीण रणसिंग,या.चेअरमन हरीभाऊ भेंडभर ,शंकर अबा वाडेकर ,उमेश जगताप गुरुजी, संदिप जगताप गुरुजी, संदिप ढफळ सर , गणेश जाधव,सागर इंगळे , सुर्यकांत टाकळकर गुरुजी, यादव सर ,संजय चव्हाण,गरुड झेप ॲकडमी चे तुषार सर ४०० विद्यार्थी,अनेक महिला भगीनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजक धर्मराज बोत्रे व चंद्रकांत वारघडे यांनी सर्वांचे आभार मानले सर्वांनी आपापल्या क्षेत्रात अशाचप्रकारे वृक्षारोपण करण्याचे आव्हान चंद्रकांत वारघडे यांनी केले . येत्या १४ तारखेला वटपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने ५०० वडाची झाडे लावली जाणार आहेत त्यासाठी ५०० महीला भगीनी उपस्थित राहणार आहेत प्रत्येक महीला एक झाड लावणार आहे व नंतर त्याच वडाची पुजा करणार जास्तीत जास्त महीलांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रशांत भागवत यांनी केले वृक्षारोपण झाल्यावर दुपारच्या सुट्टीत मस्तपैकी गरम बेसन भाकरी ची जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment