खंडोबाचीवाडी येथील जान्हवी पेठे महाराष्ट्र राज्य खो-खो संघाच्या कर्णधारपदी
.png)
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- पंचकुला हरियाणा येथे भारत सरकार आणि भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रिडा मंत्रालय आणि स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमानाने 4 थी राष्ट्रीय ( नॅशनल ) खेलो इंडिया युथ गेम्स 2022 ही स्पर्धा पंचकुला हरियाणा येथे सुरू आहे. दिनांक 9 जूनपासून खो - खो या क्रिडा प्रकाराला सुरूवात झाली आहे. खो - खो या क्रिडा प्रकारात महाराष्ट्राचे दोन्ही संघानी मुले व मुली भाग घेतले आहे दोन्ही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
मुलींच्या खो - खो संघाच्या कर्णधारपदी ( कॅप्टन ) सोलापूर जिल्ह्यातील खो - खो ची पंढरी म्हणून ओळख असलेल्या खंडोबाचीवाडी तालुका मोहोळ येथील खो - खो खेळाची वाघीन जान्हवी विजयकुमार पेठे हीची निवड झाली आहे. जान्हवीची निवड झाल्यामुळे एका छोटयाशा खंडोबाचीवाडी गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे.तीच्या निवडीबद्दल गावांमध्ये पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
जान्हवी पेठे सध्या उस्मानाबाद येथील भोसले हायस्कूल येथे 12 वी मध्ये शिकत असताना तिने 12 वी मध्ये 89 टक्के गुण मिळविले आहेत त्याचबरोबर तिचा सध्याचा खो - खो सराव हा उस्मानाबाद येथे भारतीय खो - खो महासंघाचे सहसचिव चंद्रजित जाधव त्याचबरोबर खो - खो प्रशिक्षक प्रवीण बागल सर यांच्या नेतृत्वाखाली आहे.
या निवडीबद्दल मोहोळचे माजी आमदार राजनजी पाटील, लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment