पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी घरोघरी पाण्याचे मीटर-आयुक्त पी. शिवशंकर

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात चार दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी घरोघरी पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहे. घरगुती नळासाठी प्रती हजार लिटर पाण्यास ११.५० रुपये तर वाणिज्यसाठी ३५ तर उद्योगासाठी ७० रुपये दर असणार आहे.यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु आहे. दर तीन महिन्यानी नागरिकांना बिले देण्यात येणार आहे.अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.पाण्याचे दोन प्रकारचे मीटर कसे शहरात सुमारे २.०८ मिळकत असून, यापैकी १.९२ लाख मिळकतीचे वाॅटर आॅडीट करण्यात आले. अन्य घराचे आॅडीट सुरु आहे.मीटरसाठी नागरिकांनी यापूर्वी पैसे भरले असेल तर ती रक्कम वजा होईल. प्रत्येक घरास इलेक्ट्रीक व मेकॅनिक मीटर बसवण्यात येणार आहे. दर तीन महिन्यांनी मीटरचे बिल मोबाईलवर देण्यात येणार आहे. यासाठी मक्तेदार नियुक्ती करण्यात येईल.यावेळी बोलताना आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, प्रत्येक ठिकाणी फ्लो मीटर लावले आहे. मीटर आणि फ्लोमीटरचे पाणी यांच्या सहाय्याने तपासणी केल्यास बोगस नळ सापडतील.
No comments:
Post a Comment