डांबर कमी वापरणे, निकृष्ट दर्जाचे पेव्हर व काँक्रीटचे रस्ते म्हणून ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ दरम्यान रस्त्यांची विविध कामे झाली. या कामाची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये डांबर कमी वापरणे, निकृष्ट दर्जाचे पेव्हर व काँक्रीटचे रस्ते तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.या कंपनीच्या एनएबीएल प्रमाणित दर्जा प्रयोगशाळेमध्ये रस्त्याचा 7 तपासण्यात आला.शहरात तीन महिन्यात झालेल्या १३१ रस्त्यांच्या कामाची तपासणी एका त्रयस्थ कंपनीकडून करण्यात आली. या तपासणीत ३८ रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. ३२ रस्त्यांमध्ये कमी प्रमाणात डांबराचा वापर केला आहे.
No comments:
Post a Comment