तडीपार बॉबिला अटक करताना " तिने " घेतला पोलिसांच्या हाताचा चावा; तीन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल
पोलिसांसोबत कुटुंबीयांची हुज्जत
पोलिसांनी तडीपार बॉबीला मिरवणुकीत पकडलंही आणि नंतर पोलीस ठाण्यात आणलं. मात्र त्याआधी त्याला पोलीस ठाण्यात आणताना त्याच्याच कुटुंबातील लोकांनी तीव्र विरोध केला. पोलीस कारवाई करत असताना सगळेजण पोलिसांसोबत हुज्जत घालू लागले. बॉबीला घेऊन जाऊ नका, असंही म्हणत होते. दरम्यान, पोलीस नाईक रविराज काळे आणि पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांच्याशी हुज्जत घालणाऱ्यांनी झटापट केली. रविराज काळे यांच्या शर्टाची कॉलर पकडून ओढाओढी करू लागले.
…आणि हाताचा चावा!
यावेळी एकानं पोलिसांच्या डाव्या हाताला चावा घेतला. बॉबीला सोड नाही तर बघ असं म्हणत शिवीगाळ करून धमकावण्यातही आलं. त्यामुळे शासकीय कामात अडथळा करून दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची फिर्याद पोलिसा स्थानकात करण्यात आली. पोलीस नाईक रविराज काळे यांनी ही फिर्याद दिली होती. आता याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी एकूण तीन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment