नागरिकांना प्राधान्याने आरोग्य सुविधेचा लाभ द्या ; सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 19, 2022

नागरिकांना प्राधान्याने आरोग्य सुविधेचा लाभ द्या ; सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचना

नागरिकांना प्राधान्याने आरोग्य सुविधेचा लाभ द्या ; सार्वजनिक आरोग्य  राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचना

            पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी शासन सर्वोच्च प्राधान्य देत असून  शासकीय रुग्णालयात सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना  सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिल्या.

            उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार सुशिल बेल्हेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी. कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम, मंदीर समितीचे सदस्य  संभाजी शिंदे यांच्यासह  आरोग्य विभागाचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी बोलताना श्री.यड्रावकर म्हणाले,  सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे व त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी  तातडीने दूर करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नागरिकांना विविध प्रकारच्या आरोग्य सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. शासकीय रुग्णालयांनी देण्यात येणाऱ्या उपलब्ध  वैद्यकीय सोयी सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान जनआरोग्य योजना यासह अन्य आरोग्यविषयक योजनांमध्ये उपलब्ध असणाऱ्या उपचारांची सविस्तर माहितीचे फलक प्रदर्शित करावेत,  अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे डायलेसिस, सिटी स्कॅन आदी वैद्यकीय साधन-सामग्री उपलब्ध असून जास्तीत जास्त रुग्णांना या सुविधेचा लाभ उपलब्ध व्हावा यासाठी  आवश्यक तंत्रज्ञाची  व कर्मचारी वर्गाची पदे उपलब्ध करुन देण्यात येतील. यावेळी जिल्ह्यातील सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या, लसीकरणाबाबतची माहिती घेतली. लसीकरणात शहरी व ग्रामीण लसीकरणाची टक्केवारी पाहून त्यानूसार मोहिमा राबवाव्यात, अशा सूचना यावेळी दिल्या.

            यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांनी जिल्ह्यातील रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेबाबत माहिती दिली. यावेळी राज्यमंत्री  यड्रावकर यांनी उपजिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभाग, पोषण पुनर्वसन केंद्र, सिटी स्कॅन, डायलेसीस, सोनोग्राफी, स्त्री प्रसुती गृह आदी विभागांची पाहणी केली. तसेच रुग्णालयाचे फायर ऑडीट, इलेक्ट्रीक ऑडीट व स्ट्रक्चरल ऑडीट बाबतही माहिती घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages