जिल्ह्यात ९५.४ टक्के बालकांना पोलिओचा डोस आरोग्य विभागाची माहिती राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 1, 2022

जिल्ह्यात ९५.४ टक्के बालकांना पोलिओचा डोस आरोग्य विभागाची माहिती राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

 जिल्ह्यात ९५.४ टक्के बालकांना पोलिओचा डोस आरोग्य विभागाची माहिती राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील ९५.४ टक्के बालकांना आज राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत लसीचा डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व शहरी भागात पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,  मुख्य कार्यकारी अधिकारी, दिलीप स्वामी, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती दिलीप चव्हाण यांनी बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार पोलिओ लसीकरण मोहीम पार पाडण्यात आली आहे.पंढरपूर येथे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांच्या हस्ते बालकांना दोन थेंब पोलिओची मात्रा देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदीप ढेले उपस्थित होते.जिल्ह्यातील ग्रामीण, नागरी भागात पाच वर्षाखालील एकूण ३३९५५४  बालके असून ग्रामीण भागात एकूण २४१८ आणि नागरी भागात १९८ लसीकरण केंद्र  होती. १४४ मोबाईल टीम, २०५ ट्रान्झीट टीम स्थापन  करण्यात आल्या होत्या. मनपा वगळता जिल्ह्यात 95.4 टक्के बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली. उर्वरित बालकांना २८ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२ या  पाच दिवसात आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत घरोघरी, वाडी वस्ती, उसतोडीची ठिकाणे, वीट भट्टी इत्यादी ठिकाणी भेट देऊन लस पाजण्यात येणार आहे.पल्स पोलिओ मोहिमेची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरावरून डॉ. अनघा चौधरी, जागतिक आरोग्य संघटना प्रतिनिधी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. लसीकरण मोहिमेसाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी तथा डॉ अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत कुलकर्णी, सहाय्यक संचालक (कुष्टरोग) डॉ संतोष जोगदंड ,  जिल्हा प्रशिक्षण पथक वैद्यकीय अधिकारी डॉ संगीता सोनावणे, जिल्हा सांखिकी अधिकारी दत्तात्रय कवितके जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. दळवी  जिल्हा आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे, जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख, सांखिकी पर्यवेक्षक  अशोक गाडीलकर यांच्यासह आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages