सकल मराठा समाजाच्या वतीने टेंभुर्णी शहर बंदच्या आवाहनास शंभर टक्के प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 1, 2022

सकल मराठा समाजाच्या वतीने टेंभुर्णी शहर बंदच्या आवाहनास शंभर टक्के प्रतिसाद

 सकल मराठा समाजाच्या वतीने  टेंभुर्णी शहर बंदच्या आवाहनास शंभर टक्के प्रतिसाद



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- छत्रपती संभाजी महाराज यांच्या आमरण उपोषण आंदोलनास पाठींबा देण्यासाठी व शासनाने सकल मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या टेंभुर्णी शहर बंदच्या आवाहनास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. यानिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी सकाळी करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त करून मागण्या तात्काळ मान्य करण्याची विनंती केली.अन्यथा भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचे संकेत दिले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सकल मराठा समाजाची 'मराठा समाज आरक्षणावर,मराठा ओबीसीकरण हेच आरक्षण' ही गेल्या पंचवीस वर्षापासूनची मागणी आहे.सकल मराठा समाज या मागणीवर आजही ठाम आहे.आगामी काळात सकल मराठा समाज स्वतंत्र लढा उभारणार आहे.छत्रपती संभाजी महाराज यांनी सरकारसमोर मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या ठेवून २६ फेब्रुवारी पासून मुंबईत येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले आहे.त्यांच्या मागण्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत. तरीदेखील सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे.म्हणूनच खासदार संभाजीराजे यांच्या समर्थनार्थ आज २८ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करत आहोत.मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचे संरक्षण.तसेच ओबीसीसह सर्व जातीची जातिनिहाय जनगणना करणे.सारथी संस्थेला सक्षम निधी व संस्थेचे सक्षमीकरण करून सर्व महसूल विभागानुसार सारथी कार्यालय सुरू करावे.संस्थेवर कुणबी मराठा समाजातील अभ्यासक व सामाजिक चळवळीचा प्रतिनिधी घेणे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ५०० कोटी निधी देणे.महामंडळाची कर्ज मर्यादा २५ लाखापर्यंत करणे.महामंडळावर तत्काळ संचालक नियुक्ती करावी. आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. सार्वजनिक वस्तीग्रह सुरू करावे.आरक्षण रद्द होण्याअगोदर मराठा समाजातील जे विद्यार्थी एमपीएससी व इतर परीक्षेत निवड झालेली आहे.त्यांची तात्काळ नेमणूक करावी.कोपर्डीतील नराधमांना फाशी देऊन पीडित भगिनीस न्याय द्यावा.छत्रपतीचे भव्य स्मारक मुंबईत जमिनीवर उभे करावे. या मागण्यांचा अजूनही गांभीर्याने विचार करावा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेवटी निवेदनात दिला आहे. यावेळी उपसभापती तुकाराम ढवळे,योगेश बोबडे,सचिन जगताप,विठ्ठल मस्के,गोरख देशमुख,भाऊ महाडिक,गोरख खटके,प्रा. दीपक पाटील,हरिभाऊ सटाले,प्रशांत देशमुख,पपेश पाटील,विलास देशमुख,सचिन खुळे,लक्ष्मण काळे,विजय खटके,ॲड मंगेश देशमुख,दादासो गायकवाड,नाना देशमुख,गणेश कोरडे,राहुल चव्हाण,विशाल नवगिरे,राजाभाऊ पाटील,सिद्धेश्वर देशमुख,दादा देशमुख,राजेंद्र मुळे,अमोल देशमुख,वैभव महाडिक,रणजित अटकळे,कृष्णा फाळके,गणेश लोकरे,संदीप मस्के,नागेश भुसारे,विजय देशमुख,राहुल देशमुख,नवनाथ जाधव,बाळासो कदम,अवि देशमुख,बाळासो पवार,अमोल पवार,अमित देशमुख,जयवंत देशमुख,स्वप्नील शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages