राज्यपालांनी मागावी रायगडावर जाऊन माफी शिवसेनेचे वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 1, 2022

राज्यपालांनी मागावी रायगडावर जाऊन माफी शिवसेनेचे वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन

 राज्यपालांनी मागावी रायगडावर जाऊन माफी

शिवसेनेचे वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल दुर्गराज श्री रायगडावर जाऊन माफी मागावी, या मागणीसाठी सोमवारी शहर जिल्हा शिवसेनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करून निवडून आलेल्या भाजपने नेमलेले राज्यपाल छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करतात हे निषेधार्ह आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण भारतातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी दुर्गराज श्री रायगडावर जाऊन माफी मागावी. अन्यथा शिवसेना राज्यपालांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही, असा इशाराही जिल्हाप्रमुख श्री. बरडे यांनी यावेळी दिला. शिवसेनेचे शहरप्रमुख नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, राज्यपाल कोश्यारी यांनी उत्तर प्रदेशात जाऊन कवी भूषण यांच्या लिखाणाची माहिती घ्यावी आणि मगच आपली वक्तव्ये करावीत. यावेळी राज्यपाल कोषारी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, भीमाशंकर म्हेत्रे, दत्तात्रय वानकर, संतोष पाटील, कामगारसेनेचे विष्णू कारमपुरी, नगरसेवक उमेश गायकवाड, भारतसिंग बडुरवाले, माजी नगरसेवक बापू ढगे, श्रवण भंवर, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, महेश धाराशिवकर, तुषार आवताडे, परिवहन समितीचे तुकाराम मस्के, विजय पुकाळे, अतुल भवर,  निरंजन बोध्दुल, उपशहरप्रमुख रविकांत कांबळे, सुरेश जगताप, संताजी भोळे, मलिक हब्बु, बाळासाहेब माने, रतन खैरमोडे, खंडू सलगरकर, रोहित तडवळकर, बालाजी चौगुले, सचिन गंधुरे, सिध्दाराम खजुरगी, जयराम सुंचू, चंद्रकांत मानवी, अमित भोसले, महेश ठाकरे, शिवा कोळी, प्रशांत कदम, गजेंद्र माशाळे, राम वाकसे व राज पांढरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages