स्वच्छतेबाबत व्यापक जनसहभाग गरजेचा- डॉ निशिगंधा माळी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 1, 2022

स्वच्छतेबाबत व्यापक जनसहभाग गरजेचा- डॉ निशिगंधा माळी

स्वच्छतेबाबत व्यापक जनसहभाग गरजेचा- डॉ निशिगंधा माळी
मोडनिंब (कटूसत्य वृत्त):- आरोग्य व स्वच्छतेबाबत लोकसहभाग ही सर्वात महत्वाची गोष्ट असून महिलांनी मासिकपाळी व्यवस्थापनाबाबत जागृत राहून आपल्या आरोग्याचा दर्जा उत्तम ठेवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर निशिगंधा माळी यांनी आज केले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प कुर्डूवाडी अंतर्गत रोपळे 2 विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त रोटरी क्लब मोडनिंब, कुर्डुवाडी व माढा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर स्वच्छतेचा या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. माता आरोग्य व किशोरीचे आरोग्य हाच कुटुंबाच्या विकासाचा पाया आहे त्यामुळे याबाबत व्यापक जनजागृती व लोकसहभाग गरजेचा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब मोडनिंब रोटरी क्लब कुर्डूवाडी व रोटरी क्लब माढा यांच्या सहकार्याने ऊसतोड कामगारांच्या तीन ते सहा वयोगटातील 60 मुलांना स्वच्छता किट व किशोरी मुलींना सॅनिटरी पॅड चे वाटप जागर स्वच्छतेचा अंतर्गत करण्यात आले. 
रोटरी क्लब हे सामाजिक उपक्रमांबाबत कायम सक्रिय असून भविष्यातही अशा उपक्रमांना आमचा सहभाग असणार असल्याचे कुर्डुवाडी रोटरी क्लबचे डॉक्टर सुरवसे यांनी याप्रसंगी सांगितले.
महिला बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती प्रकल्प अधिकारी आनंद जाधव यांनी दिली.
पर्यवेक्षिका अनुराधा मिस्किन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रोटरी क्लब चे रवी सुरवसे शीतल सुरवसे हर्षद शहा व नागनाथ कुबेर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले अंगणवाडी सेविका संगीता उबाळे यांनी यावेळी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
आभार प्रदर्शन श्री आप्पासाहेब उबाळे यांनी केले. विठ्ठल कार्पोरेशन च्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामस्थ व ऊसतोड कामगार महिला आणि किशोरी मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages