Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रियांका दादासाहेब वाघमोडे यांची माढा तालुका भटके विमुक्त महिला आघाडी च्या अध्यक्षपदी निवड

 प्रियांका दादासाहेब वाघमोडे यांची माढा तालुका भटके विमुक्त महिला आघाडीच्या  अध्यक्षपदी निवड 



माढा (कटूसत्य वृत्त):-प्रियांका दादासाहेब वाघमोडे यांची माढा तालुका भटके विमुक्त महिला आघाडी च्या  अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कुर्डूवाडी येथील शासकीय विश्रामगृहात भाजपा भटके विमुक्त महिला आघाडी  च्या जिल्हाध्यक्षा माया माने,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अॅड.धनश्री  खटके पाटील यांच्या प्रमुख   उपस्थितीत वाघमोडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. वाघमोडे ह्या अंजनगाव(खे) येथील राहणाऱ्या आहेत या अगोदर  त्यांनी अनेक वर्ष  रासप पक्षामध्ये  काम केले आहे.पक्ष वाढीसाठी तसेच महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचे वाघमोडे यांनी निवडीनंतर  सांगितले.यावेळी भाजपा युमो माढा तालुका अध्यक्ष उमेश पाटील,सरचिटणीस सुधीर गाडेकर, शहराध्यक्ष शंकर बागल,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उप अध्यक्ष संतोष क्षीरसागर,मंदाकिनी पाटील,भाजपा कार्यकर्ते, महिला  नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.


Reactions

Post a Comment

0 Comments