माढा न्यायालयात महिला दिन साजरा,महिलांचा केला सन्मान
माढा (कटूसत्य वृत्त):-महिला वकीलांनी शाळा महाविद्यालया मध्ये तसेच ग्रामीण भागात जाऊन महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्याचे कार्यक्रम घेण्यात यावा असे मत प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी व्यक्त केले.माढा न्यायालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.प्रारंभी महिला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.राष्ट्रपती पदक प्राप्त लता मोरे,कोविड काळात २ वर्षे रुग्नाची सेवा केल्याबद्दल डाॅ. स्वाती विद्यागज,पायलट सुजाता काळे,आर्चरी खेळात सुवर्ण पदक प्राप्त समृद्धी पवार तसेच कोरोना काळात काम केलेल्या आशा वर्कर,अंगणवाडी सेविका यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण,नगराध्यक्षा अॅडमिनल साठे,मुख्य न्यायाधीश एस.एस. सय्यद सर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सह दिवाणी न्यायाधीश ए.टी.गित्ते,न्यायाधीश एम.एस.काझी,नगराध्यक्षा मिनल साठे, नगरसेविका गीतांजली देशमुख आदी सह माढा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.गणेश सावंत यांचेसह सर्व महिला वकिल उपस्थित होत्या.कार्यक्रम सूत्रसंचालन खजिनदार अँड.उमा नितीन आखाडे, प्रास्ताविक सहसचिव अँड.सीमा काळे यांनी केले. महिला विधिज्ञा अँड.राधा चवरे,संध्या कुंभेजकर,निरांजणी राजमाने,सुनंदा भगत,सुलभा शिंदे,पूनम खोत,तेजस्विनी बारस्कर,अपेक्षा शिंदे,भाग्यश्री चवरे,सिद्धी भिसे, आदी महिला वकील सदस्यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माढा वकील संघाचे अध्यक्ष अँड. गणेश सावंत,उपाध्यक्ष श्रीकृष्ण भोसले,सचिव कृष्णा गायकवाड,लायब्रेरियन अँड.रणजित पाटील,अँड.अनंत कुलकर्णी,अँड.नवनाथ तांबिले तसेच वरिष्ठ वकील सदस्यांनी मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वी केला.
0 Comments