रुक्मिणी महिला प्रतिष्ठानच्यावतीचे व्यवसायिक महिलांचा सन्मान सोहळा संपन्न
वडापूर (कटूसत्य वृत्त):- महिला दिनाचे औचित्य साधून सोमवार दि.१४ मार्च रोजी वडापूर येथिल विवीध व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत असणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ मनोरमा सखी मंचच्या अध्यक्ष शोभाताई मोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुनिता पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सविता वाघचवरे, समाजसेविका लतिका पाटील आणि मनोरमा बँकेच्या संचालिका रंजना सुरवसे या होत्या.यावेळी ज्येष्ठ महिला अनुसया पाटील तसेच जयश्री पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महिलांनी घराचे व व्यवसायाचे योग्य आर्थिक नियोजन करुन भविष्याच्या तरतुदीला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन शोभाताई मोरे यांनी केले. ग्रामिण भागातील महिला सक्षम आहेतच त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत संस्थेचे मार्गदर्शक व मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी भावना चव्हाण, मुमताज फुलारी, स्वाती वाघचवरे, शैला कदम, वासंती पाटील, शुभांगी पाटील, जयश्री गुंड, माधुरी नवले, प्रियांका कोडक, पारसे या व्यवसायिक महिलांचा सन्मानपत्र व भेट वस्तु देऊन सन्मान करण्यात आला. जिजाऊ महिला बचत गटातील सर्व महिलांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता पाटील यांनी केले , ओळख सुरेखा पाटील यांनी करुन दिली , सुत्रसंचलन कामिनी भोसले यांनी तर आभार प्रतिज्ञा भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदना वाघचवरे, सारिका पाटील, वैशाली पाटील, ज्योत्सना पाटील, विशाखा पाटील, मालन पाटील, माधुरी पाटील जयमाला पाटील आदींनी प्रयत्न केले..
0 Comments