डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमास फळे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 4, 2022

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमास फळे वाटप

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांच्या वतीने  मातोश्री वृद्धाश्रमास फळे वाटप




सांगोला(कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्यातील मातोश्री वृद्धाश्रम येथे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रांतिक सदस्य प्राध्यापक पी सी झपके सर यांच्या शुभहस्ते व सांगोला तालुका व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्री वृद्धाश्रम येथे फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. " केक कापणे यासह इतर अनावशक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत  सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा फळे वाटपाचा कार्यक्रम वृद्धाश्रमाच्या ठिकाणी घेतल्यामुळे एक प्रकारे चांगला संदेश मिळालेला आहे असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रांतिक सदस्य पीसी झपके सर यांनी व्यक्त केले " व जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रांतिक सदस्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी सी झपके सर, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष मैनाताई बनसोडे ,युवक आघाडीचे राज्य सरचिटणीस अजयसिंह इंगवले, सांगोला तालुका अध्यक्ष सुनील भोरे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे ,शहराध्यक्ष तोहिद मुल्ला, काँग्रेसचे नेते रवीप्रकाश साबळे, वेठबिगार समितीचे सदस्य बाबासाहेब आईवळे ,सामाजिक कार्यकर्ते कमृद्दिन काझी ,उद्योगपती अनिल बेहरे, सचिन काटे ,मातोश्री वृद्धाश्रमाचे अध्यक्ष राहुल जाधव यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages