कंदलगाव येथील मोहिनी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट सोलापूरच्या वैभवात भर टाकणार : 9 मार्चपासून कार्यान्वित होणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 5, 2022

कंदलगाव येथील मोहिनी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट सोलापूरच्या वैभवात भर टाकणार : 9 मार्चपासून कार्यान्वित होणार

 कंदलगाव येथील मोहिनी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट 
सोलापूरच्या वैभवात भर टाकणार : 9 मार्चपासून कार्यान्वित होणार 







सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे मोहिनी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून येत्या  9 मार्च 2022 पासून हा प्रकल्प जनतेसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती, या प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष कुमार करजगी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वॉटर पार्कमध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वॉटर स्पोर्ट ,रेन डान्स, नौकाविहार ,वॉटर गेम यासह थ्रीडी थिएटर, बाबा गाडी, डॅशिंग कार ,चाइल्ड स्लाईड आदींचा यामध्ये समावेश आहे. कंदलगाव येथे अठरा एकर जागेवर हा देखना प्रकल्प साकारण्यात आला असून सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वैभवात या प्रकल्पामुळे निश्चितच भर पडेल ,असा विश्वास कुमार करजगी यांनी व्यक्त केला.या प्रकल्पामध्ये लहान मुलांसाठी विविध राइड्स तसेच मोठ्यासाठीसुद्धा थरारक राइट्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यासोबत अमुझमेंट पार्कची मजादेखील अनुभवयास मिळणार आहे. याशिवाय या सर्वांसोबत निसर्गोपचार केंद्र देखील उभारण्यात आले आहे.


                                              

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages