सांगोला विद्यामंदिर ज्युनि. कॉलेजमध्ये इ.१२ वी बोर्ड परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 4, 2022

सांगोला विद्यामंदिर ज्युनि. कॉलेजमध्ये इ.१२ वी बोर्ड परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत

 सांगोला विद्यामंदिर ज्युनि. कॉलेजमध्ये इ.१२ वी बोर्ड परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत

   

सांगोला (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे कडून घेण्यात येणाऱ्या इ.१२ वी बोर्ड परीक्षेला काल शुक्रवार दिनांक ०४/०३/२०२२ रोजी सुरूवात झाली.कोरोना महामारीनंतर सदरची बोर्ड परीक्षा   ऑफलाईन पद्धतीने संपूर्ण राज्यात घेतली जात आहे.सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मध्ये इ.१२ वी कला, वाणिज्य व शास्त्र शाखेतील परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे मुख्य प्रवेशद्वारावर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रत्येक परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे प्रथमतः सॅनि टायझर,थर्मल चेकिंग करूनच प्रवेश दिले गेले.यावेळी दक्षता समितीचे सदस्य शिवाजी साळुंखे यांचे हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, पर्यवेक्षक बिभीषण माने,पोपट केदार,अजय बारबोले,दक्षता समितीचे सदस्य प्रा.अमर गुळमिरे,प्रा.प्रकाश धोत्रे, विजयकुमार कसबे,विलासराव पाटील,सुनील झपके उपस्थित होते.सदर परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून प्रा.गंगाधर घोंगडे,उपकेंद्र संचालक प्रा.सौ.शहिदा सय्यद,प्रा.लक्ष्मण विधाते,प्रा.चिंतामणी देशपांडे तर स्टेशनरी सुपरवायझर म्हणून प्रा.डी.के.पाटील काम पाहत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages