नविन कार चोरणाऱ्यां तिघांना अटक, ४३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत मोहोळ डीबी पथकाची कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 1, 2022

नविन कार चोरणाऱ्यां तिघांना अटक, ४३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत मोहोळ डीबी पथकाची कारवाई

 नविन कार चोरणाऱ्यां तिघांना अटक, ४३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
 मोहोळ डीबी पथकाची कारवाई



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- नविन कार शोरूमला घेऊन जाणा - या चालकास रस्त्यात अडवून मारहाण करून तीन कार पळवणा - या टोळीस मोहोळ गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केले चोवीस तासात जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.  याबाबत माहिती अशी की शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी नवीन कार शोरूम ला घेऊन जाणाऱ्या रस्त्यात अडवून मारहाण करून तीन कार चोरून नेल्या होत्या याबाबत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिमंतराव जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या आदेशान्वये गुन्हा घडल्यानंतर तपासाची सुत्रे जलद गतीने फिरवून चोरीस गेलेल्या कारचे जी.पी .आर .एस. तात्काळ उपलब्ध करून सदर कारचे लोकेशन हैद्राबाद येथे असल्याचे निष्पन्न झाल्या नंतर तात्काळ सदर ठिकाणी रवाना होवून शहानिशा करून कार हया हैद्राबाद येथील कुकटपल्ली येथील रामदेवराव हॉस्पीटल मधील पार्किंग मध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीसांच्या मदतीने सदर ठिकाणी जावून मिळून आलेल्या कारच्या जवळ न जाता बाजूस कार वरती दबा घरून अंदाजित चार तासानंतर तीनजन जवळ आले लागलीच त्यांना कल्पना येण्या अगोदर त्यांचा वरती झडप घालून पकडले त्यावेळी त्यांच्या वरती रामदेवराव हॉस्पीटल च्या गेट बाहेरून पाहणारे दोन आरोपी त्यांच्या ताब्यात असलेली काळ्या रंगाची सोनेट कार मध्ये बसून पळून गेले व त्यांना आपण पण सापडू या भीतीने त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची कार थोडया अंतरावर रोडच्या बाजूस सोडून पळून गेले . मिळून आलेल्या दोन कार व तीन आरोपी १) नियाज रशीद मोहमंद वय ३० वर्षे रा . घ . नं . ८५ बलीत मोहल्लाह गाव सपनकी मोबाईल टॉवर जवळ ता . हथीन जि . पलवन राज्य हरीयाना २) शोयब मोहमंद सय्यद वय ३५ वर्षे , रा . गणेश पेठ चेटुगल्ली चाळ हुबळी ता हुबळी जि . झारवाड राज्य कर्नाटक ३) शेखरगोडा दुड्डानागनगौडा हळ्ळी वय ५२ वर्षे रा . घर नं . ११४ सेंकड मेन रोड चौथा कास रोड जवळ नागप्पा कटटी रामनजीन्या नगर ता . बेल्लाळी बेल्लाळी छावणी राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेवून मिळालेल्या आरोपीच्या आधारे काळ्या रंगाची कार पण पकडली पण आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाले तरी मिळालेल्या तीन आरेपीतांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या तीन्ही कार जप्त करण्या आल्या सदर चोरी गेलेल्या कारची एकूण किमंत ४३,४९,००२ / - रूपये सदरच्या सर्व कार जप्त करून हैद्राबाद वरून ताब्यात घेवून मोहोळ पोलीस ठाणेस आणून जप्त केल्या आहेत.  सदरची करवाई ही पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिमंतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने , पोहेकॉ शरद ढावरे , पोकॉ. गणेश दळवी पोकॉ. पांडुरंग जगताप , पोकॉ लखन घाडगे या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages