बोगस डॉक्टरमुक्त' बोगस डॉक्टरांचा वाढता ताप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 27, 2022

बोगस डॉक्टरमुक्त' बोगस डॉक्टरांचा वाढता ताप

बोगस डॉक्टरमुक्त' बोगस डॉक्टरांचा वाढता ताप

रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही बोगस डॉक्टर बिनदिक्कतपणे सोलापूर शहर जिल्ह्यात रुग्णांवर उपचार करत आहेत.

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही बोगस डॉक्टर बिनदिक्कतपणे सोलापूर शहर जिल्ह्यात रुग्णांवर उपचार करत आहेत.
 या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले असून चुकीच्या उपचारांमुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वेळीच अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची जाणकारांकडून मागणी होत आहे. 
मात्र,आरोग्य विभागाकडून कारवाईचे पाऊल उचलले जात नाहीत. बोगस डॉक्टर नवीन विडी घरकुल जुना विडी घरकुल पूर्व भागात तसेच शहरातील झोपडपट्टी परिसरात दवाखाने थाटून बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. 
गोरगरिबांना तज्ज्ञ डॉक्टरांची फी परवडत नाही. बोगस डॉक्टरांची फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या डॉक्टरांकडे जातात. हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णांनाही कळत नाही. शिवाय, रुग्णही डॉक्टरच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जास्त चौकशी करीत नाहीत. 
आरोग्य विभागाकडून शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक डॉक्टरकडे चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत असल्याचे दिसून येते. 
सोलापूर शहर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची मोठी डोकेदुखी वर्षानुवर्षे कायम असून 'बोगस डॉक्टरमुक्त' शहर जिल्हा करण्यासाठी आरोग्य विभागाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages