मराठी राजभाषा दिनानिमित्त अरण्यऋषींचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 27, 2022

मराठी राजभाषा दिनानिमित्त अरण्यऋषींचा सत्कार

मराठी राजभाषा दिनानिमित्त अरण्यऋषींचा सत्कार

       सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  मराठी  भाषा समृद्ध होण्यासाठी एक लाख शब्दांचे  योगदान देणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा मराठी राजभाषा दिनांचे औचित्य साधत नगरसेवक विनोद भोसले यांनी शाल आणि पुष्पच्छ  देऊन सत्कार केला .महाराष्ट्र शासनाच्या वतीने या योगदानाबद्दल विंदा करंदीकर पुरस्काराने गौरविण्यात आले होते .शासनाच्या वतीने ग्रँथरुपात हे शब्द प्रकाशित करण्याची इच्छा चित्तमपल्ली  यांनी यावेळी व्यक्त केली. वयोमानाने मला शासनाकडे पाठपुरावा करणे शक्य नाही. मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या लोकप्रतिनिधीनी शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा. तीस वर्षांपासून कष्ट करीत संशोधनातून मिळवलेला हा शब्दरूपी ठेवा सर्वसामान्यापर्यंत पोचवावे असे मत त्यांनी व्यक्त केले . अक्कलकोट रोडवरील मानिधारी सोसायटीतील  चित्तमपल्ली यांच्या निवासस्थानी  चाकवाचांदणे या त्यांच्या आत्मचरित्रासह जंगलातील विविध किस्से सांगत विनोद भोसले यांच्याशी  त्यांनी दिलखुलास  गप्पा मारल्या .यावेळी बसवराज कोळी, दिनेश जाधव, सौरभ साळुंखे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages