व्यापारी मोफत वाचनालयात मराठी राजभाषा दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 27, 2022

व्यापारी मोफत वाचनालयात मराठी राजभाषा दिन साजरा

व्यापारी मोफत वाचनालयात मराठी राजभाषा दिन साजरा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- येथील व्यापारी मोफत वाचनालयात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.
" ज्ञानपीठ पुरस्कार" प्राप्त आणि महाराष्ट्रातील कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर तथा कवि कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी दि. २७ फेब्रुवारी रोजी *मराठी राजभाषा दिन* म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वि.वा.शिरवाडकर (तात्या ) आणि स्वातंत्रवीर सावरकर ( तात्या) यांच्या प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे संचालक जयेश आराध्ये (सर), मोहोळचे माजी उपसरपंच गौतम क्षीरसागर, जेष्ठ वाचक व्ही.जी. कुलकर्णी (सर), आणि वाचनालयाचे मुख्य ग्रंथपाल दिलीप काका देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी बोलताना आराध्ये सरांनी शिरवाडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. आणि आपल्या बोलण्यात इंग्रजीचा वापर कमीतकमी करावा. असे सांगितले. त्याच बरोबर व्ही.जी. कुलकर्णी यांनी मराठी भाषेची महती सांगितली. तर मोहोळ तालुका सरचिटणीस महेश सोवनी यांना स्वातंत्रवीर सावरकरांनी मराठी भाषाशुद्धी कशी केली. महापौर, सारखे इतर शब्द कसे मराठी भाषेला दिले याचा सविस्तर उहापोह केला. तर मुख्य ग्रंथपाल तथा पत्रकार दिलीप देशपांडे म्हणाले," प्रत्येकाने महिन्याला एक मराठी पुस्तक वाचावे असा संकल्प करावा असे आवाहन केले. तर ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक राजन घाडगे यांनी वि.वा.शिरवाडकर यांच्या  कवितेचे वाचन केले. आणि आभार सहायक ग्रंथपाल मदन कुलकर्णी यांनी मानले.
यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय आठवले, ग्राहक पंचायतचे नूतन तालुका अध्यक्ष मुकूंद कुलकर्णी, नांदगांवचे युवा नेते गोरख (भाऊ) पाटील,राजू कारंडे ,दतात्रय कुलकर्णी, ज्ञानेश्वर सुतार,  आरोग्य विभागाचे निवृत्त अधिकारी दिलीप देशपांडे, शहाजहान बागवान, आदिंसह अनेक वाचक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages