मराठी भाषा गौरव दिनानिमित्त डॉ.शिवाजीराव देशमुख यांचे सोमवारी ऑनलाईन व्याख्यान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 27, 2022

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त डॉ.शिवाजीराव देशमुख यांचे सोमवारी ऑनलाईन व्याख्यान

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त डॉ.शिवाजीराव देशमुख यांचे सोमवारी ऑनलाईन व्याख्यान
जिल्हा ग्रंथालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे आयोजन

सोलापूर (जिमाका):- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्राध्यापक डॉ. शिवाजीराव देशमुख यांचे 'मराठी भाषेचे महत्त्व' या विषयावर सोमवार,दि.२८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता गुगल मीटवर ऑनलाईन व्याख्यान होणार आहे.
हे व्याख्यान जिल्हा ग्रंथालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.
ऑनलाईन व्याख्यानासाठी गुगल मीटवरील लिंक अशी आहे. https://meet.google.com/cwf-bffy-wis
याशिवाय फेसबुकवर लाईव्ह पाहू शकता.
 *Facebook* :-
https://fb.me/e/49FByfSFk

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages