मराठा सेवा संघाच्या वतीने वधू-वर परिचय महामेळावा संपन्न. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 27, 2022

मराठा सेवा संघाच्या वतीने वधू-वर परिचय महामेळावा संपन्न.

मराठा सेवा संघाच्या वतीने वधू-वर परिचय महामेळावा संपन्न
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- वधू-वर सुचकसाठी(परिचय) एजंटगिरी सुरू झाली असून याला आळा बसवण्यासाठी मराठा सेवा संघ यांच्या वतीने भाई विश्वासराव फाटे मंगल कार्यालयामध्ये वधू-वर परिचय महामेळाव्याचे मासाहेब जिजाऊ व छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व जिजाऊ वंदना वनवून घेण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ शिवश्री प्रशांत पाटील, तर जिल्हा अध्यक्ष वधू-वर कक्ष म.से.सं शिवश्री गोवर्धन गुंड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
                 प्रसंगी शेतकऱ्यांमध्ये एवढी दानत कोणाकडे नाही शेतकरी व नोकरी असा भेदभाव न करता सुखी संसार हा आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असतो  तसेच आज युवकांनी पत्रिका जुळून येत नसल्याने अनेक लग्न मोडत असल्याचे निदर्शनास येत आहे युवकांनी छत्रपती यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनाची वाटचाल करावी बोलताना मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष मनोज मोरे म्हणाले.
                यावेळी दत्ता मुळे मराठा सेवा संघ जिल्हा, शिवमती नंदाताई शिंदे प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र, शिवश्री सोमनाथ राऊत जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, जिल्हाध्यक्षा उज्वलाताई साळुंखे, शिक्षण महर्षी जीवन यादव, संजय जाधव कार्याध्यक्ष, तानाजी चटके कार्याध्यक्ष ग्रामीण सो,सदाशिव पवार शहराध्यक्ष जिल्हा सो, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, डॉ प्रमोद पाटील, चंद्रकांत फाटे,बाळासाहेब गायकवाड, संगीता फाटे, विष्णू थिटे, संभाजी चव्हाण, संतोष गायकवाड,आकाश फाटे, धनराज फाटे,दीपक पारडे,अजय चव्हाण, सज्जन सातपुते, रमेश साठे, शरद माने, प्रभाकर शिंदे, सखाराम मोरे,लक्ष्मण कदम,मुकेश बचुटे, भाग्यश्री फाटे, संध्या फाटे,माधुरी पाटील, अश्विनी शिंदे, अमृता फाटे, प्रांजली फाटे संजीवनी गुंड आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages