माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्षपदी सतीश पालकर
अकलूज (कटूसत्य वृत्त):- काँग्रेस कमिटीचे जिल्हाअध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे सतिश पालकर यांची नुकतीच काँग्रेस कमिटीच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे मान्यतेने व महाराष्ट्राचे प्रभारी एच. के . पाटील , सह प्रभारी सोनल पटेल , माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे , जिल्हा प्रभारी मोहनदादा जोशी , सह प्रभारी चेतनजी चव्हाण यांचे मान्यतेने जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहीते - पाटील यांनी सोलापुर जिल्हा काँग्रेस कमिटीची जिल्हा कार्यकारिणी , तालुकाध्यक्ष यांची निवडीची यादी प्रसिद्ध केली. डॉ. धवलसिंह मोहीते - पाटील यांनी सतिश पालकर यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण आणि विचार गावा गावात पोहचवण्यासाठी आणि पक्ष संघटना वाढविण्यासाठी काम करावे असे सांगितले . डॉ . धवलसिंह मोहीते - पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणुन परीचित असणारे सतिश पालकर हे शंकरराव मोहीते - पाटील सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन असून यापुर्वी त्यांनी जनसेवा संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष व सोलापुर जिल्हाध्यक्षपदावर उत्तम रित्या काम केले आहे.त्यांचेकडे असणारे संघटन कौशल्य तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी निश्चितच फायदाचे ठरणार आहे.
0 Comments