५० टक्के रक्कम भरा, कृषीपंपाचं वीजबिल माफ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषीपंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२० जाहीर केलेले आहे. यानुसार कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात येत आहे. थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरल्यास वीज बिल कोरे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, वने राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त हरिष बैजल, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, कृषी सभापती अनिल मोटे यांच्यासह लोकप्रतिनिधी व स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाविद्यालय स्तरावरून १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण झाले पाहिजे.
कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने ५० हजाराचे अर्थसाह्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण १० हजार आठशे एक अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यातील ३ हजार ५१७ अर्ज मंजूर झालेले असून मंजूर झालेल्या अर्जदाराच्या बॅंक खात्यावर थेट पन्नास हजाराचे अनुदान देण्याची कार्यवाही सुरू आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन राबवून हातभट्टीची दारू विकणाऱ्या आणि बनविणाऱ्या व्यक्तींना त्यापासून परावृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. हातभट्टीवर उपजिविका असणाऱ्या ६०० कुटूंबापैकी ३२६ कुटूंबाचे पुनर्वसन केले. ही कुटूंबे पशुपालन, शेती आणि लघुउद्योग करीत असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा लसवंत करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःहून लस घ्यावी, ८५ टक्के नागरिकांचे लसीकरण जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर २८ हजार ४०० बेडची उपलब्धता जिल्ह्यात १९० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन निर्मितीमध्ये जिल्हा स्वयंपूर्ण जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू स्वच्छ शाळा, सुंदर शाळा अभियानात लोकसहभागातून २५६० शाळांचे अद्यावतीकरण
स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियानात जिल्ह्यात लोकसहभागातून आठ कोटीचे कामे झाली. २५६० शाळा स्वच्छ सुंदर व अद्यावत झाल्या. यावर्षी वन विभाग शहरासह पालखी तळाजवळ मियावाकी पद्धतीने रोपवन लागवड करणार आहे. सिद्धेश्वर वनविहार येथे प्रथमच वन्यजीवांसाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारले जात आहे. ४०० हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड केली जाणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.
0 Comments