आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे; अजित पवारांच्या सूचना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 6, 2022

आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे; अजित पवारांच्या सूचना

 आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे; अजित पवारांच्या सूचना


मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात करोना विषाणूचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे आणि इतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयाने काम करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.राज्यातील नवीन करोना विषाणू सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडीत, डॉ. अजित देसाई उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, राज्यातील करोना संसर्गाने बाधितांची संख्या वाढत आहे, ती आटोक्‍यात आणण्यासाठी कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. सौम्य लक्षणे असणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. करोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत. उपचारासाठी आवश्‍यक असणाऱ्या अत्यावश्‍यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्‍यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages