Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांचा जन्मदिन जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांचा जन्मदिन जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांचा जन्मदिन अर्थात वाढदिवस जाणताराजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.* प्रथम राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ होते. या वाढदिवसाचे औचित्य साधून जिजाऊ ज्ञान मंदिरातील बालचमुंच्या‌ सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने विविध विषयावर भव्य वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. एकंदरीत या स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.' आजच्या तरुणांपुढील आव्हाने ''माझी शाळा''माझा आवडता नेता' आणि माझी आई आदी विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत वक्तृत्व कला सादर केली. त्यामध्ये श्रावणी भोसले, कोमल ढेपे, दिव्या गुंड,अंकिता भोसले, शिवानी रॉय ,संस्कार सुतार, पूजा शिंदे ,प्रणाली जाधव ,लक्ष्य सिंग या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ म्हणाले, शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राज सत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता हीच समाजाच्या यशाची पंचसूत्री आहे. हा विचार माझ्या मनामध्ये बालपणीच रुजला गेला आणि त्यातूनच शिक्षण सत्ता हीच मानवाचा विकासाची गुरुकिल्ली आहे.हे मला पुरुषोत्तम खेडेकर साहेब  यांच्या विचारातून समजले.आणि त्यानंतर हे विचार आचरणात आणण्यासाठी मी मनापासून प्रामाणिक प्रयत्न केले.त्यातूनच जिजाऊ ज्ञान मंदिर उभा केले.देव ,धर्म ,जात ,पात, अंधश्रद्धा या बेड्या झुगारून पुस्तकाशिवाय मस्तक सुधारत नाही हेच सत्य आहे आणि त्यासाठी आजच्या तरुणांनी वाचन चिंतन आणि मनन करून कृती शीलतेवर भर देणे काळाची गरज आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि पुरुषोत्तम खेडेकर यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचले तरच अज्ञानी समाज जागा होऊ शकतो. अन्यथा समाज परिवर्तन होण्यासाठी आणखी बराच वेळ लागेल.जर आपल्या मनात तीव्र इच्छाशक्ती ,जिद्द आणि प्रयत्नांमध्ये सातत्य असेल तरच कोणत्याही प्रकारचे यश आपण सहज मिळू शकतो .कारण एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हे आपण पाहिले आहे. शिक्षण हेच प्रमुख साधन असल्यामुळे तरुणांनी वाचन करण्याची गरज आहे असे भाषणाला पूर्णविराम देतांना त्यांनी सांगितले.यावेळी प्रा.सुवर्णा माने यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य सुषमा नीळ, मुख्याध्यापिका पुनम कापसे, वैभव मसलकर, रवी कोटकुंडे, संकेत मोरे ,अश्विनी नीळ, अर्चना औरादे, एसपी काटे , दादा साहेब नीळ आदीसह विद्यार्थी शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments