कलागुणांना वाव देत खेळाडू घडविण्याचा उपक्रम स्तुत्य : राजन पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 11, 2022

कलागुणांना वाव देत खेळाडू घडविण्याचा उपक्रम स्तुत्य : राजन पाटील

 कलागुणांना वाव देत खेळाडू घडविण्याचा उपक्रम स्तुत्य : राजन पाटील



पेनूर येथे राजन माने यांच्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांचे मातृपितृ प्रेम श्रेष्ठ असून त्यांच्या मृत्यूनंतर फुल स्पीच क्रिकेट स्पर्धेसोबत गावातील व परिसरातील तरुणांच्या कलागुणांना वाव देऊन ग्रामीण भागातले खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू स्पर्धेत सामील होण्यासाठी प्रोत्साहन देत क्रिकेटच्या स्पर्धा भरविल्या त्यांच्या या आई वडील प्रेमाला आमचे वंदन असून असेच सामाजिक कार्य करीत राहण्याच्या सदिच्छा देत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील यांनी केली.
पेनूरचे सुपुत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा सोलापूरचे राजन आबाजी माने यांचे आईवडील कै.सुशील माने व आबाजी सिद्धू माने यांच्या स्मरणार्थ भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे पारितोषिक वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या स्पर्धेमध्ये ४१ हजाराचे प्रथम पारितोषिक यश २४ क्रिकेट क्लब वेळापूर,२५ हजाराचे द्वितीय पारितोषिक ग्रीन स्टार क्रिकेट क्लब मोहोळ,१५ हजाराचे तृतीय पारितोषिक यमाईदेवी क्रिकेट क्लब कोरफळे तर ७ हजाराचे चतुर्थ पारितोषिक गिरीश गवळी स्पोर्ट्स पेनूर या संघाने पारितोषिके जिंकली आहेत.
यावेळी माजी आमंदार राजन पाटील,  वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने, एडिशनल एसपी कुबेर चवरे,पोलीस निरीक्षक वेळापुरे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,माजी सरपंच हरिश्चंद्र चवरे,सरपंच सुजित आवारे,सरचिटणीस रमेश माने,ग्रा.प.सदस्य रामदास चवरे,युवा उद्योजक सागर चवरे,ग्रा.प.सदस्य चरणराज चवरे,सचिन चवरे,समाधान माने,अचीत चवरे,रौपभाई तांबोळी,राजू सलगर,स्पर्धेसाठी ग्राउंड उपलब्ध करून देणारे भाऊसाहेब सलगर,विठ्ठल सलगर,तुकाराम माने,दत्ता गवळी,राजाभाऊ गवळी,कुमार आवरे,सुहास आवारे,बिभीषण माने, दत्नाभाऊ चवरे,सिद्धेश्वर चवरे,बाळू चवरे पैलवान,रणजित चवरे,बंडू सलगर,संग्राम डोंगरे,संतोष चवरे आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आईवडीलांचा सामाजिक कार्याचा छंद संकल्प म्हणून पुढील काळातही राबवणार पेनूर गावातील सुशिक्षित बेकार तरुणांसाठी पहिल्यापासूनच स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर कोणतेही उपक्रम असो राबवण्याचा प्रयत्न पहिल्यापासूनच होता त्यामध्ये आई-वडिलांनाही सामाजिक कार्य करण्याचा छंद होता.तो छंद संकल्प म्हणून पूर्ण करण्यासाठी माझी हालचाल होती परंतु त्यांच्या मृत्यू नंतरही तो संकल्प पुढे नेत तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या क्रिकेटच्या स्पर्धा भरवली असून यामधून बऱ्याच तरुणांना वाव मिळण्यास मदत होणार आहे.अशा प्रकारचे अनेक उपक्रम यापुढेही मी राबवणार आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages