सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन मंदिरास विद्युत रोषणाई
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग ८ येथे नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक अमर पुदाले यांच्या भांडवली निधीतून मल्लिकार्जुन मंदिर परिसराध्ये पेव्हर ब्लॉक, स्ट्रीट लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे असे विविध कामाचे सुशोभीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन मंदिरास अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. याभागतील समस्या दूर होत असल्याने प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यापुढील काळात देखील आम्ही प्रभागातील समस्या सोडवण्यास कटिबद्ध आहोत कोणत्याही समस्या असल्यास प्रभागातील नागरिकांनी आम्हाला कळवावे आम्ही त्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करू व आमच्या पाठीशी असेच नागरिकांनी आशीर्वाद रुपी पाठीशी राहावे असे आवाहन नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक अमर पुदाले यांनी बोलताना केले.
यावेळी सुधीर थोबडे, मल्लिनाथ मसरे, संदेश भोगडे, सोमेश्वर मेंगाने, राजशेखर हिरेहब्बू, प्रतीक थोबडे, सिद्धेश थोबडे, बिपिन धुम्मा, सचिन कुलकर्णी, योगीनाथ कुरले, सुरेश मम्हाणे, नागनाथ मेंगाने, बसवराज डुमणे, योगेश होळीमठ, जगदीश हिरेमठ, मनोज हिरेहब्बू, राहुल टूमणे, असीम शिंगी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment