मोहोळ पोलिसात गुन्हा : आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना
सावकाराच्या शेतात आठ गाड्या, घरेदीखत, व्याजाच्या नोंदी घरातचेक,
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- पेनूर येथील सावकाराच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्याच्या घरातून वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळ्या बँकेचे मोठ्या प्रमाणात कोरे धनादेश, इसारा पावत्या, अनेकांचे खाते उतारे, अनेकांचे खरेदीखत, व्याजाने दिलेल्या पैशाच्या नोंदी असलेल्या डायऱ्या आढळून आल्या, तसेच घरासमोरीलशेतात व पत्रा शेडमध्ये ४ चारचाकी वाहने, चार मोटारसायकली अशी वाहने आढळून आली आहेत. मोहोळच्या सहायक निबंधक कार्यालयाच्या पथकाने चौकशी करून
पेनूर येथील खासगी सावकाराच्या विरोधात अवैध सावकारीचा व्यवसाय केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील भीमराव बजरंग चवरे या खासगी सावकाराकडून पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील सचिन परमेश्वर रणदिवे व योगेश परमेश्वर रणदिवे या दोघांनी प्रत्येकी दीड लाख रुपये दररोज २० टक्के दराने घेतले होते. त्या रकमेपोटी या दोघांनी
चवरे याला साडेचार लाख रुपये परत केले होते, तर तारण म्हणून मालवाहतूक अशोक लेलैंड टमटम नोटरी व उसनवार पावती दिलेली होती. या रकमेपोटी तारण म्हणून स्वतःची जमीन लिहून दिली होती. यापोटी या सावकाराने १० टक्के व्याजाने रक्कम वसूल केली होती. या तिघांनी सोलापूर येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. सचिन रणदिवे याने स्टेट बँकेचे कोरे धनादेश दिले होते. याच बरोबर तुंगत येथील ब्रह्मदेव परमेश्वर रणदिवे यांनी चवरे याच्याकडून सहा लाख रुपये तीन टक्के व्याजदराने घेतले होते. त्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा सहायक निबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ येथील सहायक निबंधक कार्यालयाच्या पथकाने मोहोळ पोलिसांच्या मदतीने पेनूर येथील भीमराव चवरे यांच्या शेतात छापा टाकला. यावेळी खासगी सावकारकीसाठी वापरली जाणारी कागदपत्रे मोठ्या प्रमाणात आढळून आली. या कारवाईदरम्यान भीमराव चवरे व त्यांच्या घरातील लोक पळून गेले आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे करीत आहेत.
No comments:
Post a Comment