शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा.सावंतांनी साधला एस.टी कर्मचाऱ्यांशी संवाद
कुर्डूवाडीत एस.टी चे ७० कर्मचारी हजर तर १० बससे धावल्या.!
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- कुर्डूवाडी एस.टी.आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर यावे.असे विनंती सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत यांनी केली.यावेळी कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचा पुष्पहार व गुच्छ देऊन स्वागत करण्यात आली.कुर्डूवाडी एसटी आगारातील ७० कर्मचारी हजर झाल्याची व १० बसेस सुरु झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रा. सावंत यांना सोलापूर जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी व कामगारांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानंतर शिवाजी सावंत यांनी सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कुर्डूवाडीत एस.टी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कुर्डुवाडी बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक मिथुन राठोड, बसस्थानक प्रमुख हांडे,वाहतूक निरीक्षक शरद वाघमारे,सहाय्यक निरीक्षक शिवराज पाटील,वाहतूक नियंत्रक राजाराम परबत,राजू नवले,प्रमुख कामगार श्रीकांत माशाळ,किरण शिंदे,प्रशांत देशमुख,गणेश लंगोटे,विलास सावंत, आदींसह कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुर्डुवाडी एस टी स्टॅन्डवर शिवसेना नेते प्रा.शिवाजी सावंत व एस.टी आगार प्रमुख मिथुन राठोड यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे विनंती केली.१० एस.टी.बसेस धावू लागल्या तर ७० कर्मचारी हजर झाले व उर्वरित कर्मचाऱ्यांना सुद्धा कामावर हजर राहण्याची विनंती यावेळी करण्यात आली.वाहक चालक या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून बस स्थानकातून मार्गस्थ झाली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अरविंद पवार,कुर्डुवाडी शहर प्रमुख समाधान दास,महिला उपजिल्हा प्रमुख आशाताईं टोणपे,प्रीयांका शिंदे,उप शहर प्रमुख आप्पा ढवळे जितेंद्र गायकवाड,हंबीरराव गोरे,शिवराज पवार,युवराज परबत,राजाभाऊ शिंदे,शिवराज खेडकर,सौरभ इंगळे,विनायक गायकवाड,दिगंबर तोरणे,आवधू नावगैरे,संतोष बागल,रोहित पवार,सागर शिंदे,निलेश सवणे,मनोज गायकवाड,सोमनाथ हनवते,लखन शिंदे,सकलेन कादरी, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व एस टी कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment