सोलापूरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची रंगली हुरडापार्टी; जिल्ह्याचं नेतृत्व द्यावे कोणाकडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 11, 2022

सोलापूरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची रंगली हुरडापार्टी; जिल्ह्याचं नेतृत्व द्यावे कोणाकडे

 सोलापूरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची रंगली हुरडापार्टी; जिल्ह्याचं नेतृत्व द्यावे कोणाकडे



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माजी आमदार तथा बाजार समितीचे संचालक दिलीप माने यांच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावातील फार्महाऊसवर सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. जिल्ह्याचं नेतृत्व बबनदादा व सोपल साहेबांनी करावं, अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती आहे.
या बैठकीला ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश हसापुरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी महाविकासआघाडी  मधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष या सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते.
जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख व ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक हे दोन्ही नेते एकत्रित बसून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा दूध संघाची मोट व्यवस्थित बांधत होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून निघावी हा या बैठकी मागचा उद्देश होता, हे काय लपून राहिले नाही.
आगामी होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघाची निवडणूक ही एकत्रितपणे येऊन लढवायची तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी करून या माध्यमातून सर्व निवडणुका लढवायच्या असे या बैठकीत निश्चित झाल्याचे वृत्त आहे.
मात्र या सर्व निवडणुकांमध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करणे आणि समन्वय ठेवण्यासाठी ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप सोपल या दोन नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्याचे ठरले आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख हे सध्या राजीनामा देण्यास तयार नाहीत, त्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांच्या फार्महाऊसवर झालेली ही बैठक निश्चितच अनेक राजकीय समीकरणे बदलणारी ठरणारी आहे. या बैठकी आडून आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर दबावतंत्र वापरले जाणार का, अशीही चर्चा होत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages