सोलापूरातील गुंठेवारीची बांधकामाची प्रकरणे त्वरित मार्गी लावणार मनपा आयुक्त शिवशंकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 11, 2022

सोलापूरातील गुंठेवारीची बांधकामाची प्रकरणे त्वरित मार्गी लावणार मनपा आयुक्त शिवशंकर

 सोलापूरातील गुंठेवारीची बांधकामाची प्रकरणे त्वरित मार्गी लावणार मनपा आयुक्त शिवशंकर

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हद्दवाढ भागातील गुंठेवारी पद्धतीत खरेदी झालेल्या जागेला नियमीत करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले शासनाने देखील स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना केली, पालिकेच्या सर्वसाधारण सभेने देखील गुंठेवारीची प्रकरणे त्वरित मार्गी लावण्याचे आदेश आयुक्तांना दिले होते, तरी देखील आयुक्त मोजणी केल्याशिवाय नियमित न करण्याच्या निर्णयावर ठाम होते,त्याच दरम्यान राज्यभरात काही दिवसापुर्वी पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी बैठक घेऊन आयुक्ताना गुंठेवारीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी दबाव टाकला होता,
दरम्यान सोमवारी आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक नागेश भोगडे, आणि पालिक आयुक्त पी.शिवशंकर यांची महापौर कार्यालयात गुंठेवारी संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी पालिका आयुक्तांनी सुरुवातीस अकराशे प्रकरणे त्वरित निकाली काढतो आणि उर्वरित प्रकरणे पाच महिन्यात मोजणी करून नियमित करतो अस अभिवचन आयुक्तांनी दिल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.
आजच्या चर्चे नंतर आयुक्त नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील पालिका आयुक्तांनी सुरुवातीस अकराशे प्रकरणे त्वरित निकाली काढतो आणि उर्वरित प्रकरणे दोन ते तीन महिन्यात मोजणी करून नियमित करून देतो असे आश्वासन यावेळी आयुक्त शिवशंकर यांनी व्यक्त केल्याचे  माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.आयुक्त त्यांचे शब्द पाळतील असे महापौर म्हणल्या.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages